प्रभात वृत्तसेवा दापोडी – “आमचा प्रभाग आहे थर्टी, आम्ही राजकारण खेळत नाही डर्टी. माझं शेड्युल आहे बिझी, म्हणूनच सांगतो तुम्ही निवडून येणार इझी.” “मला नेहमीच असे वाटे, कधीतरी आमच्या सोबत येतील काटे,” अशा शीघ्र कवितांद्वारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दापोडीकरांना खळखळून हसविले.प्रभाग ३० मधील भाजप-महायुतीचे उमेदवार संजय नाना काटे, चंद्रकांता सोनकांबळे, प्रतिभा जवळकर आणि उषा मुंडे यांच्या प्रचारासाठी दापोडी येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित सभेत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत फटकेबाजी करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. उमेदवारांचे कौतुक करताना त्यांनी “आमच्या सोबत नाही गुंडे, कारण आमच्या सोबत आहे उषा मुंडे,” असे यमक साधत कार्यकत्र्यांमध्ये विश्वास आणि उत्साह भरला. यावेळी परशुराम वाडेकर, तानाजी काटे, सुरेश काटे, संतोष काटे, विजय केंद्रे, कैलास मते, विनायक काटे, अशोक काटे, विशाल वाळुंजकर, कैलास बनसोडे, सुनीता अडसूळ, धर्मेंद्र क्षीरसागर, कालीचरण पाटोळे, सिकंदर सूर्यवंशी सागर फुगे हेमंत फुगे, शोभा पगारे, अरविंद ओव्हाळ, राहुल फलके, सनी खंडागळे, प्रकाश जवळकर, कुणाल जवळकर, बाळासाहेब जवळकर रघुनाथ जवळकर आरती सोनवणे, प्रकाश तात्या जवळकर, सिकंदर सूर्यवंशी, शशी भाऊ देशपांडे, विशाल वाळुंजकर, अजय झुंबरेराजेश शिंदे, गोवर्धन काटे, राहुल फलके, संतोष काटे, किसन मिसाळ, बंडू गायकवाड, भाऊ मस्के, ज्योतीताई कांबळे आणि शशि देशपांडे उपस्िथत होते. महापौर महायुतीचाच यावेळी रामदास आठवले म्हणाले, बाबासाहेबांनी महिलांना न्याय देण्यासाठी हिंदू कोड बिलाचा आग्रह धरला होता. आता या निवडणुकीत सर्व घटक एकत्र असून शहराचा महापौर महायुतीचाच होईल. दलित समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी संघटनेसाठी दिलेले योगदान आणि आता सर्व शक्ती एकवटल्याने विजयाचे गणित सोपे झाले आहे. जुन्या आठवणींना उजाळा या प्रसंगी उमेदवार नाना काटे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. १९९४ साली स्वतः नाना काटे आणि चंद्रकांता सोनकांबळे एकमेकांच्या विरोधात लढले होते, मात्र आता काळ बदलला असून विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे त्यांनी सांगितले. काटे आणि सोनकांबळे यांच्या एकत्र येण्यामुळे खऱ्या अर्थाने ‘भीमशक्ती आणि शिवशक्ती’ यांची युती झाली असून, या मोठ्या ताकदीमुळे आमचा विजय आता निश्चित झाला आहे, असा विश्वास नाना काटे यांनी व्यक्त केला.