पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरातील इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले आहेत. सर्व १२८ जागांसाठी अर्ज करण्याचे आवाहन पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केले आहे. शहराध्यक्ष कामठे यांनी सांगितले की, सर्व ३२ प्रभागांतील इच्छुक उमेदवारांकडून सोमवार (दि. १) ते सोमवार (दि. ८) पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पक्षाचे पिंपळे निलख येथील कार्यालयात इच्छुकांनी अर्ज सादर करावेत. अर्जासोबत उमेदवारांनी आपली माहिती देताना अर्जदाराचे संपूर्ण नाव, विधानसभेचे नाव, प्रभागाचे नाव, प्रभाग क्रमांक, मतदार यादीतील भाग व अनुक्रमांक, आरक्षण प्रवर्ग (ओपन, ओबीसी, एससी, एसटी), जात वैधता प्रमाणपत्र छायांकित प्रत, जन्म दिनांक, वय, शिक्षण, आधार कार्ड, पक्षाचा क्रियाशील व प्राथमिक सदस्य क्रमांक आदींसह आपला कार्य अहवाल जोडणे आवश्यक आहे. महापालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटनात्मक तयारी करण्यात येत असून, इच्छुक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अर्ज सादर करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आले आहे.