Hinjewadi : तब्बल नऊ वर्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने अनेक इच्छुकांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे मनसुबे आखले होते. त्यानुसार अपेक्षेप्रमाणे हिंजवडी माण जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या दोन आशा एकूण तीन जागांसाठी ३८ जणांनी उमेदवारी अर्जही दाखल केले होते. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व बंडखोरांना शांत करण्यात व त्यांना वेगवेगळी आश्वासन देऊन बंडखोरी रोखण्यात भाजप व राष्ट्रवादी सारख्या प्रमुख पक्षांना यश आले आहे. यंदा हिंजवडी माण गट व गणात एकूण ३८ जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी पक्षश्रेष्ठींनी विनवणी केल्यानंतर २० जणांनी माघार घेतली. तर १८ जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामध्ये ७ पुरूष व ११ महिलांचा समावेश आहे. उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर पक्षांच्या चिन्हावर लढणाऱ्या उमेदवारांनी लगेच प्रचाराचा शुभारंभ करत नारळ फोडला. अनेकांनी प्रचार देखील सुरू केल्याने पक्षश्रेष्टींनी बंडखोरांना प्रचारात सहभागी होण्यासाठी विनवण्या केल्या. अखेर कुणी जिल्हा नियोजन तर कुणी स्वीकृत सदस्य होण्याच्या महत्वकांक्षा व्यक्त करत पक्षश्रेष्ठींना खिंडीत पकडले होते. शेवटच्या क्षणी काहींची समजूत काढून पक्षाने बहुतांश बंडखोरांना वेगवेगळी आश्वासन देऊन शांत केले. हिंजवडी – माण जिल्हा परिषद गट रिंगणात असलेले उमेदवार पुढीलप्रमाणे – जाधव राहुल बाळू ( काँग्रेस- पंजा ) शिवाजी राजाराम बुचडे (भाजपा- कमळ),नागेश बबन साखरे (शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष- मशाल), बाबासाहेब चंद्रकांत साखरे (शिवसेना -धनुष्यबाण ), सागर दत्तात्रेय साखरे (राष्ट्रवादी काँग्रेस- घड्याळ), दत्तात्रय रामभाऊ चांदारे (अपक्ष-नारळ), अंकुश राजाराम जगताप, (अपक्ष – चष्मा) हिंजवडी पंचायत समिती गण सई मयूर जाधव (शिवसेना – धनुष्यबाण), वाघमारे ऐश्वर्या प्रशांत (भाजप – कमळ),निकीता नंदकुमार वाघमारे (राष्ट्रवादी काँग्रेस – घड्याळ), निशा अशोक सपकाळ (शिवसेना- मशाल ), चिचखेडे रेखा प्रमोद (वंचित बहुजन आघाडी- गॅस सिलेंडर ), माण पंचायत समिती गणातून निवडणुकीच्या रिंगणात आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे पारखी युगधंरा नवनाथ ( भाजप- कमळ), पारखी सीमा सूर्यकांत ( कॉंग्रेस – पंजा), कल्पना प्रकाश भेगडे ( शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष – मशाल ), पायल प्रशांत रानवडे , (शिवसेना – धनुष्यबाण), मंदा कृष्णराव शेळके (राष्ट्रवादी-घड्याळ), रुपाली नवनाथ बोडके अपक्ष -( भाजप पुरस्कृत शिलाई यंत्र ) जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज मागे घेतलेले उमेदवार पुढीलप्रमाणे – सुरेश पांडुरंग हुलावळे (भाजप अपक्ष), पांडुरंग मारुती ओझरकर (भाजप अपक्ष), रामचंद्र देवकर (भाजप अपक्ष), नवनाथ गंगाराम पारखी (भाजप अपक्ष), प्रकाश भेगडे (शिवसेना उबाठा अपक्ष), नंदकुमार भोईर (राष्ट्रवादी अजित पवार गट अपक्ष), विलास साखरे (अजित पवार गट अपक्ष), सोमनाथ मातेरे (अपक्ष) हिंजवडी पंचायत समिती गणातील अर्ज माघारी घेतलेले उमेदवार पुढीलप्रमाणे जयश्री ओव्हाळ (अपक्ष), सुरेखा गायकवाड (अपक्ष), प्रेरणा ओव्हाळ (अपक्ष), श्रुती पवार (अपक्ष) माण पंचायत समिती गणातून अर्ज मागे घेतलेले उमेदवार पुढीलप्रमाणे – अर्चना गंगाराम मातेरे (अपक्ष), सोनाली मातेरे (अपक्ष), श्रद्धा सावंत (अपक्ष) सारीका खानेकर (अपक्ष), निकीता घोगरे (अपक्ष), शिला शेळके (अपक्ष), सुवर्णा भोईर (अपक्ष), वृशाली आमले (अपक्ष)