प्रभात वृत्तसेवा पिंपरी – रस्ता ओलांडत असताना दुचाकीने धडक दिल्याने पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. १८) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास चाकण येथे घडली.प्रविण चंद्रकांत रोडे (गुळाणी, ता. खेड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शरणबसप्पा विठ्ठल कुंभार (३३, संतोषनगर, भाम, ता. खेड, पुणे) यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विठ्ठल कुंभार असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे वडील विठ्ठल कुंभार हे रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या उजव्या हात-पायाला फ्रॅक्चर होऊन डोक्याला गंभीर दुखापत झाली व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चाकण उत्तर पोलीस तपास करीत आहेत.