प्रभात वृत्तसेवा पिंपरी – श्री क्षेत्र आळंदी नगरपरिषदेत भाजपाने जोरदार मुसंडी मारत २१ पैकी १५ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच नगराध्यक्षपदी प्रशांत पोपट कुऱ्हाडे यांनी बहुमताने विजय मिळवला, हा भाजपासाठी ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपाने दिमाखदार यश संपादन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या महायुतीने राज्यभर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यातील २८८ नगरपरिषदांपैकी २१४ हून अधिक नगराध्यक्ष पदांवर भाजपाच्या महायुतीने विजय मिळवला असून, भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या यशाबद्दल पिंपरी-चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. पुणे जिल्ह्यातील उत्तर पुणे जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडताना पक्ष संघटना, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एकजूट आणि विकासकेंद्रित मुद्द्यांमुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरल्याचे आमदार लांडगे यांनी स्पष्ट केले. ‘‘विकासाभिमुख हिंदुत्व’’ या भूमिकेला मतदारांनी दिलेला स्पष्ट कौल भाजपाच्या धोरणांवरील विश्वास दर्शवतो, असे आमदार लांडगे म्हणाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यभूमीत मिळालेला हा विजय भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांना समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले. आळंदीतील या महाविजयाची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतही होईल, असा ठाम विश्वास व्यक्त करत आमदार लांडगे यांनी विजयी उमेदवारांचे पुन्हा एकदा अभिनंदन केले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दिमाखदार यश मिळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 288 पैकी भाजपा महायुतीने या घडीला 214 हून अधिक नगराध्यक्षपदी विजय मिळवला आहे. यामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सर्व विजयी उमेदवारांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.भाजपा पक्षश्रेष्ठींनी माझ्याकडे पुणे जिल्ह्यातील उत्तर पुणे जिल्हा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. पक्ष संघटन आणि स्थानिक पदाधिकारी- कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे आणि विकासाच्या मुद्यांवर ही निवडणूक लक्षवेधी ठरली. आळंदी नगरपरिषदेत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. “आळंदीतील 21 पैकी 15 जागांवर भाजपाने दणदणीत विजय मिळवला. तसेच, आळंदी नगराध्यक्षपदी प्रशांत पोपट कुऱ्हाडे यांचा बहुमताने विजय झाला. ‘‘विकासाभिमूख हिंदुत्व’’ च्या मुद्यावर भाजपाला पहिली पसंती देणाऱ्या मतदारांचे आभार व्यक्त करतो. माऊलींच्या आळंदीतील विजयाची आणि राज्यातील भाजपाच्या महाविजयाची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत निश्चितपणे होईल, असा विश्वास आहे.” – महेश किसनराव लांडगे,आमदार, भाजपा