प्रभात वृत्तसेवा पिंपरी – सर्व मतदान केंद्रांवर प्रशासनाकडून उमेदवारांची शैक्षणिक माहिती देणारे मोठे फलक दर्शनी भागात लावण्यात आले. प्रभाग क्रमांक २९ मध्ये प्रशासनाने या फलकात घोळ घालत उच्चशिक्षित महिला उमेदवाराचे शिक्षण नववीपर्यंतच असल्याचे नमूद केले. यामुळे महिला उमेदवार आणि त्यांचे समर्थक संतप्त झाले आणि मतदान केंद्राबाहेरच ठिय्या आंदोलन करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक २९ मधील उमेदवार सुनिता कोळप यांचे शिक्षण प्रशासनाने फलकावर नववी असे दर्शविले. कोळप यांचे म्हणणे आहे की त्या उच्चशिक्षित असून प्रशासनाने प्रकाशित केलेल्या खोट्या माहितीचा मतदारांवर विपरीत परिणाम पडत आहे. यामुळे सुनिता कोळप आपल्या समर्थकांसह मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलनास बसल्या.