Jennifer Winget Networth: हिंदी टेलिव्हिजन विश्वात अनेक कलाकार मालिकांच्या माध्यमातून मोठं यश आणि पैसा कमावतात. त्यापैकी एक लोकप्रिय नाव म्हणजे जेनिफर विंगेट. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. जेनिफरने दिल मिल गये, बेपन्नाह, बेहद, बेहद २, शका लका बुम बुम, कसौटी जिंदगी की यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. टीव्हीवर यश मिळवल्यानंतर तिने ओटीटीवरील वेब सीरिजमध्येही दमदार भूमिका साकारल्या असून तिथेही तिला मोठी लोकप्रियता मिळाली. बालकलाकारापासून यशस्वी अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास जेनिफरने १९९५ मध्ये बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. राजा की आएगी बारात या चित्रपटातून ती प्रेक्षकांसमोर आली. त्यानंतर शका लका बुम बुम या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. Jennifer Winget जेनिफर विंगेटची संपत्ती किती? मिळालेल्या माहितीनुसार जेनिफर विंगेटची एकूण संपत्ती सुमारे ४२ कोटी रुपये आहे. मुंबईत तिचं स्वतःचं आलिशान घर असून तिच्याकडे महागड्या गाड्यांचाही ताफा आहे. आज ती ऐषोरामाचं आयुष्य जगत आहे. एका शोसाठी तब्बल दीड कोटी मानधन जेनिफर एका टीव्ही शोसाठी सुमारे १.५ कोटी रुपये मानधन घेते. त्यामुळे ती हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या आणि श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. खासगी आयुष्य जेनिफरने २०१२ मध्ये अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केलं होतं. मात्र पुढे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नंतर करण सिंग ग्रोवरने अभिनेत्री बिपाशा बासूसोबत लग्न केलं असून त्यांना एक मुलगी आहे.