Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी – भाऊचा धक्का’च्या एपिसोडमध्ये (Bigg Boss Marathi) घरात मोठा धक्का बसला. डेंजर झोनमध्ये आयुष – ओमकार आले आणि ओमकार राऊत घराबाहेर गेला. रितेश भाऊंच्या उपस्थितीत झालेल्या या निर्णायक क्षणाने सदस्यांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडलं, तर घरात शांततेसोबतच अस्वस्थतेचं वातावरणही निर्माण झालं. आता येत्या आठवड्यात घरात सदस्यांना मोठा धक्का बसणार आहे. कारण घरात काहीतरी असं घडणार आहे ज्याचा कोणी विचार देखील केला नसेल, सदस्यांना मोठं सरप्राइज मिळणार आहे. त्याचसोबत घरात कोणते टास्क रंगणार ? कोण घराचा कॅप्टन ठरणार ? कोण होणार नॉमिनेट ? कोण घरात टिकणार आंणि कोण बाहेर जाणार ? हे बघणे अधिक मनोरंजक होणार आहे. Omkar Rau या ‘भाऊचा धक्का’मध्ये रितेश भाऊंनी आपल्या खास स्टाईलमध्ये रुचिताला थेट समज देत रुचिता–दिपालीमधील वादावर भाष्य केलं. करण आणि प्राजक्ताच्या कमेंट्रीवरही रितेश भाऊंची स्पष्ट टिपणी पाहायला मिळाली. विशाल आणि टोळीच्या खेळीचं कौतुक करताना, टोळीच्या रणनीतीला दाद देण्यात आली, तर सचिनचे विचार रितेश भाऊंच्या मनाला भिडले आणि हा क्षण घरासाठी भावनिक ठरला. ओंकारच्या एक्झिटनंतर आता पुढील आठवडा अधिकच निर्णायक ठरणार आहे. कोण सुरक्षित राहणार, कोण असुरक्षित होणार? पुढच्या नॉमिनेशनमध्ये कोणाची नावं पुढे येणार आणि पुढचा प्रवास कोणाचा थांबणार? घरात नवी समीकरणं तयार होणार की जुन्याच वादांना उधाण येणार? आणि सर्वात महत्त्वाचं पुढचा ‘राडा’ नेमका कोण घालणार? या सगळ्याची उत्तरं लवकरच ‘BIGG BOSS मराठी’च्या आगामी एपिसोड्समध्ये मिळणार आहेत.