Maruti Suzuki e-Vitara : मारुती सुझुकीने १७ फेब्रुवारी रोजी आपली पहिली इलेक्ट्रिक SUV eVitara भारतात लॉन्च केली. या गाडीची सुरुवातीची किंमत ₹10.99 लाख (BaaS मॉडेलसह) ठेवण्यात आली आहे. बॅटरी-ऐज-ए-सर्व्हिस (BaaS) पर्यायामुळे ग्राहकांना बॅटरी वेगळी भाड्याने घेता येते, त्यामुळे गाडीची सुरुवातीची किंमत कमी राहते. तर बुकिंग रक्कम ₹21,000 आहे. या कारच्या फीचर्सपासून परफॉर्मेंसचे पूर्ण डिटेल्स आपण जाणून घेऊया. बॅटरी आणि रेंज : 49 kWh (सिंगल मोटर, फ्रंट व्हील ड्राइव्ह) – शहरासाठी योग्य 61 kWh (ड्युअल मोटर, AllGrip-e AWD) – 543 किमी ARAI प्रमाणित रेंज डिझाइन आणि फीचर्स : 18-इंच एरोडायनामिक अलॉय व्हील्स तीन-पॉइंट मॅट्रिक्स LED DRL आणि टेललॅम्प व्हेंटिलेटेड सीट्स, 10-वे पॉवर अॅडजस्ट ड्रायव्हर सीट 7 एअरबॅग्स, लेव्हल-2 ADAS 360° कॅमेरा, वायरलेस चार्जिंग, एम्बिएंट लायटिंग कंपनीची पहिली मोठी एन्ट्री ! ही SUV NEXA डीलरशिपमधून विकली जाणार असून भारतातच उत्पादन होऊन परदेशात निर्यातही केली जाईल. 5-स्टार भारत NCAP रेटिंगसह eVitara भारतीय EV बाजारात मजबूत स्पर्धा निर्माण करण्यास सज्ज आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये कंपनीची ही पहिली मोठी एन्ट्री आहे. ग्राहकांना चांगली रेंज, मजबूत सुरक्षा आणि आराम मिळत आहे.