पहिल्या सामन्याचा थरार –
\nवडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने ५० षटकांत ८ बाद ३०० धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने ४९ व्या षटकात ६ गडी गमावून हे लक्ष्य यशस्वीरीत्या गाठले. विराटने या विजयात मोलाचा वाटा उचलल्यामुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना १४ जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे.