Vaibhav Suryavanshi : 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याने ICC अंडर-१९ विश्वचषक २०२६ च्या फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर अविश्वसनीय १७५ धावांची खेळी साकारली. केवळ ८० चेंडूत १५ चौकार आणि १५ षट्कार लगावत त्याने इंग्लिश गोलंदाजांचा धुव्वा उडवला. या झंझावाती इनिंगच्या जोरावर (Vaibhav Suryavanshi) भारताने ५० षटकांत ४११/९ धावा केल्या आणि सामना १०० धावांनी जिंकून सहाव्यांदा U19 विश्वचषक जिंकला. वैभवला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ आणि ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’चा बहुमान मिळाला. वैभव सूर्यवंशीची ही खेळी इतकी विध्वंसक होती की, केवळ बाउंड्रीच्या मदतीने (१५ चौकार + १५ षट्कार = १५० धावा) त्याने १५० धावा पूर्ण केल्या. त्याने अर्धशतक ३२ चेंडूत, शतक ५५ चेंडूत आणि १७५ धावा ८० चेंडूत पूर्ण केल्या. Vaibhav Suryavanshi ही खेळी U19 विश्वचषक फायनल किंवा नॉकआउट सामन्यातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे. यापूर्वीचा विक्रम १७२ धावांचा होता. तसेच, ICC स्पर्धांच्या फायनलमध्ये (U19 किंवा सिनियर) ही सर्वोच्च धावसंख्या आहे. Someone arrest Vaibhav Sooryavanshi right now. This violence on the field against the English bowlers is X-rated! — Iceland Cricket (@icelandcricket) February 6, 2026 आईसलँड क्रिकेट बोर्डाने केली अटकेची मागणी खरं तर आईसलँड क्रिकेट आपल्या मजेशीर ट्विटसाठी ओळखलं जातं. वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक खेळीनंतर देखील आईसलँडने ट्विट करत सर्वांना चकित केलं. वैभव सूर्यवंशीला आताच्या आता अटक करा. इंग्लिश गोलंदाजांविरुद्ध मैदानावर चाललेला हा हिंसाचार अत्यंत धोकादायक आहे, असं म्हणत पुणेरी टोमण्यात आईसलँड क्रिकेटने वैभवचं कौतूक केलं आहे. त्यावर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत. हे पण वाचा : T20 World Cup 2026 : ‘सूर्या आम्ही येतोय…’, युएसएच्या कर्णधाराने सुर्यकुमार यादवला दिली चेतावणी