Under -19 World Cup : आयसीसीच्या १९ वर्षांखालील विश्वचषकाचे (Under -19 World Cup) विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआय ७-५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देईल. भारताने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला 100 धावांनी हरवून सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. सामन्यानंतर भारतीय खेळाडूंच्या जल्लोषाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यात वैभव सूर्यवंशी भोजपुरी गाण्यावर नाचताना दिसत आहे. संघाच्या सेलिब्रेशनच्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये वैभव म्हणतो की, ‘पंजाबी गाणे समजत नाहीये मित्रांनो, आता भोजपुरी लागेल’. यानंतर वैभवने पवन सिंहचे ‘सॉरी-सॉरी’ हे गाणे लावले. यानंतर सर्व खेळाडू या भोजपुरी गाण्यावर नाचत होते. व्हिडिओच्या शेवटी वैभव म्हणतो की, आता माझ्याकडून आजसाठी एवढेच पुरेसे आहे. आयपीएलच्या राजस्थान रॉयल्सने डान्सच्या व्हिडिओ क्लिपवर कमेंटही केली आणि लिहिले की, ‘एक बिहारी सब पर भारी’.या विजेतेपदाचा खरा नायक वैभव सूर्यवंशी ठरला. अंतिम लढतीत 175 धावांच्या खेळीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले, तर संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक षटकार मारल्यामुळे तो ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ देखील ठरला. त्याने 7 सामन्यांमध्ये 62.71 च्या सरासरीने 439 धावा केल्या, ज्यात 41 चौकार आणि 30 षटकारांचा समावेश होता. हा पुरस्कार व त्यातून मिळालेली रक्कम वैभवने सपोर्ट स्टाफला समप्रित केली आहे.