T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ (T20 World Cup 2026) मध्ये भारताने आज आपल्या गतविजेता पदवी राखण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. मुंबईच्या प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर भारत आणि अमेरिका (युएसए) यांच्यातील ग्रुप A चा हा पहिला सामना ७ वाजता सुरु होणार आहे. युएसएने टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. टीम इंडियाला सामन्यापूर्वीच धक्का सामन्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज खेळू शकणार नाही. BCCI च्या माहितीनुसार, बुमराहला आजारपणामुळे (व्हायरल ताप) विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. याशिवाय संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनाही आज संधी मिळालेली नाही. Suryakumar Yadav भारताची प्लेइंग इलेव्हन अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंग, भारत आणि युएसए यांच्यातील सामने भारत आणि युएसए यांच्यात आतापर्यंत फक्त एकच आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला गेला आहे. २०२४ टी-२० विश्वचषकात झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला होता. यंदा युएसए पुन्हा मजबूत आव्हान देण्यासाठी सज्ज आहे, तर भारत घरच्या मैदानावर मजबूत सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे. ग्रुप A मधील संघ भारत ग्रुप A मध्ये आहे, ज्यात भारतासोबत पाकिस्तान, युएसए, नामिबिया आणि नेदरलंड्स या संघांचा समावेश आहे. आजचा सामना भारतासाठी मजबूत सुरुवात करण्यासाठी महत्त्वाचा आहे. क्रिकेटप्रेमींसाठी हा रोमांचक सामना असणार आहे.