T20 World Cup 2026 : भारत आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026 (T20 World Cup 2026 ) चे सह-आयोजन करत असून, स्पर्धेला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर धमाकेदार सुरुवात झाली आहे. डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून उतरलेली टीम इंडिया विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानली जात आहे. मात्र, स्पर्धेच्या (T20 World Cup 2026 ) सुरुवातीपूर्वीच आणि पहिल्या सामन्यातच खेळाडूंच्या तब्येतीबाबत अनेक समस्या समोर आल्या आहेत. हर्षित राणा (दुखापत), वॉशिंग्टन सुंदर (अजूनही संघात सामील झाला नाही), जसप्रीत बुमराह (ताप) यांच्यानंतर आता तरुण सलामीवीर अभिषेक शर्माचीही तब्येत बिघडल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. शनिवारी भारताने वर्ल्डकपची सुरुवात अमेरिकेविरुद्ध केली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने १६१ धावा केल्या. सूर्यकुमार यादवच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारताने सामना जिंकला, पण अमेरिकेच्या डावादरम्यान अभिषेक शर्माची तब्येत अचानक बिघडली. T20 World Cup 2026 सामन्याच्या सुरुवातीला क्षेत्ररक्षण करताना तो मैदानावर होता, पण लवकरच त्याला मैदानाबाहेर जावे लागले. त्यानंतर तो इतर खेळाडूंसोबत दिसला नाही आणि त्याच्या जागी संजू सॅमसनने सबस्टिट्यूट फील्डर म्हणून क्षेत्ररक्षण केले. कर्णधार सूर्यकुमार यादव याने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत याबाबत स्पष्ट केले. “अभिषेकची तब्येत बिघडली होती… तो बॅटिंग करताना तापाने त्रस्त होता आणि नंतर मैदानावर दिसला नाही. बुमराहलाही सामन्याच्या सुरुवातीला ताप होता.” अभिषेक या सामन्यात टी20 विश्वचषकमध्ये डेब्यू करताना पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने अभिषेकच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती दिली. सिराज म्हणाला, “अभिषेकला पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या होत्या, ज्यामुळे त्याला मैदानातून बाहेर काढावे लागले. त्याचे महत्त्व लक्षात घेता, त्याला पुन्हा मैदानात उतरवले नाही.” मात्र, सिराजने दिलासादायक बातमीही दिली. “सर्व काही ठीक आहे. त्याचे पोट थोडे बिघडले होते, म्हणून तो फील्डिंगला आला नाही. पुढच्या सामन्यापर्यंत तो पूर्णपणे बरा होईल आणि आपला जलवा दाखवेल. विश्वचषकात अपेक्षेनुसार कामगिरी करण्यासाठी तो उत्सुक आहे,” असे सिराज म्हणाला. भारताचा पुढचा सामना नामिबियाविरुद्ध १२ फेब्रुवारी रोजी आहे. अभिषेक आणि बुमराह यांच्या परतण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. हे पण वाचा : बॅालीवूडमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं; गांधी टॅाक्समधील प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केले मत