प्रभात वृत्तसेवा वाघोली – सिग्नल सुटल्यानंतर डंपरची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील महिला डंपरच्या चाकाखाली सापडून महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. 6) दुपारी एकच्या सुमारास आव्हाळवाडी फाटा चौक येथे घडली. याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिभा अरुण नोनंदकर (रा. दिघी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे याप्रकरणी महिलेचे अरुण यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नोनंदकर पती पत्नी आव्हाळवाडी फाटा येथे दुचाकीवर थांबले असता सिग्नल सुटल्यानंतर डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोघेही खाली पडले. प्रतिभा यांच्या अंगावरून डंपर गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी डंपर चालक बापुराव कांबळे (रा. वाघोली) याच्यावर वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.