प्रभात वृत्तसेवा पिंपरी – भरधाव वेगातील कारने धडक दिल्याने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 22) ताथवडेतील लोंढे वस्ती परिसरात घडली.रूद्रअभिषेक प्रभातरंजन दास (वय 32, रा. प्लॅटीनम पार्क सोसायटी, माणगाव, ता. मुळशी, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या कार चालकाचे नाव आहे. माणिक मारुती ओव्हाळ (वय 43, रा. ताथवडे) यांनी मंगळवारी (दि. २३) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अरूण मारूती ओव्हाळ (वय ४०, र. मारणे वस्ती, माणगाव, ता. मुळशी जि. पुणे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सव्वाअकरा वाजताच्या सुमारास आरोपीने निष्काळजीपणे कार चालवून पादचारी अरूण ओव्हाळ यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास हिंजवडी पोलीस ठाणे करीत आहे.