प्रभात वृत्तसेवा थेऊर – थेऊर – कोलवडी रस्त्यावरून घरी जात असताना दुचाकी रस्त्यात अडवून एकाच कुटुंबातील चार जणांना शिवीगाळ करून लाकडी बैटने पट्टी व दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाली आहे.ही घटना थेऊर (ता. हवेली) हद्दीतील श्री चिंतामणी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय शाळेच्या मेनगेट समोर मंगळवारी (दि. 16) रात्री 8 ते 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बकासुरासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनिष्का गणेश नायक (वय 19, नोकरी रा. घावटेवस्ती, नम्रता कॉलगी, साई विश्व सोसायटी, प्लॅट नंबर 203, मांजरी बुद्रुक) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अक्षय धनाजी सोनवणे, प्रसाद धनाजी सोनवणे, सविता धनाजी सोनवणे (रा. थेऊर) व बकासूर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या महिरीनुसार, फिर्यादी तनिष्का नायक व त्यांचे पती गणेश, सासु अंबीका, सासरे दिलीप नायक व नणंद लक्ष्मी हे सर्वजण मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथील घरी मोटार सायकलवरुन चालले होते. तेव्हा थेऊर कोलवडी रस्त्यावरून जात असताना, त्यांच्या दुचाक्या श्री चिंतामणी शाळेच्या मेनगेट जवळ आल्या. तेव्हा पाठीमागुन अचानक अक्षय धनाजी सोनवणे, प्रसाद धनाजी सोनवणे व बकासुर तेथे आले. त्यांनी दुचाक्या अडवल्या. आणि शिवीगाळ करण्यास सुरवात केली. दरम्यान, अक्षय सोनवणे व प्रसाद सोनवणे यांनी लाकडी बैटने, पट्टीने फिर्यादी तनिष्का, अंबीका नायक व नंणद लक्ष्मी सोनवणे यांना मारहाण केली. तर बकासुर याने तेथे रोडच्या कडेला पडलेला दगड हातात घेऊन फिर्यादी तनिष्का नायक यांना मारला. तनिष्का नायक यांच्या कपाळला दगड लागल्याने त्या जखमी झाल्या. त्यानंतर आरोपींनी अंबीका नायक व लक्ष्मी सोनवणे हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली.