प्रभात वृत्तसेवा पिंपरी – ऑनलाईन ओटीसी ट्रेडिंगमध्ये शंभर टक्के नफा मिळण्याचे आमिष दाखवत एका महिलेची ५५ लाख २२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना चिखली येथे ऑनलाइन पद्धतीने घडली. याप्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनुप्रिता डागा (मो. ८४६०५९०८२९), तसेच smcace अॅप व smcace.top वेबसाईटचे धारक यांच्यासह सारस्वत बँकेचे खाते ६१००००००००५३६६३ व आयडीएफसी बँकेची खाती १००७३९८९१३०, १०२२८१२१८९७, ९२४०२००७४८३७८१५ या खातेदारांवर गुन्हा दाखल आहे. याबाबत राजे शिवाजी नगर, सेक्टर १६, चिखली येथील एका ३७ वर्षीय महिलेने शनिवारी (दि. ६) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २६ मे ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून चिखली येथे घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनुप्रिता डागा हिने स्वतःला SMC Investor Alliance H2 ग्रुपची अॅडमिन म्हणवत फिर्यादी यांना शेअर बाजारातील ओटीसी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. “१०० टक्के परतावा मिळेल” असे सांगून फिर्यादीकडून विविध बँक खात्यांतून एकूण ५५ लाख २२ हजार ७९१ रक्कम जमा करून घेतली. मात्र गुंतवणुकीवर कोणताही परतावा न देता आरोपींनी रक्कम हडप केली. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.