प्रभात वृत्तसेवा पिंपरी – मागील वादाचा राग मनात धरून तिघांनी संगणमत करून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. १६) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मुळशी तालुक्यातील सुसगाव येथे घडली.प्रणव काशीनाथ वाघमारे ऊर्फ चिक्या (वय १९, रा. सुतारवाडी, पाषाण, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच क्षीरसागर (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) आणि त्यांचा एक साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सिद्धांत कैलास मानमोडे (वय २०, रा. ईशाता फटाका मार्ट समोर, सुसगाव, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी मंगळवारी (दि. १६) बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्यतीचा बैल पळविण्याच्या कारणावरून महिनाभरापूर्वी झालेल्या वादातून आरोपींनी फिर्यादीला मोबाइलवर धमकी देत शिवीगाळ, दमदाटी केली. त्यानंतर तिघांनी आपसांत संगनमत करून डोक्यावर तसेच शरीरावर धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणाचा अधिक तपास बावधन पोलीस करीत आहे.