प्रभात वृत्तसेवा पिंपरी – एका तरुणाला प्रेमविवाह करण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली. तर त्याची मैत्रीण जबरदस्तीने इर्टीगा गाडीत ढकलून बसविण्याचा प्रयत्न झाला. ही घटना चाकण तळेगाव चौक येथे गुरुवारी दि. 27) रात्री 10.50 वाजताच्या सुमारास घडली.शुभम अवताडे, साहील तिजोरे व सुधीर केदारी (पूर्ण नाव, पत्ता उपलब्ध नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. प्रशांत सुधाकर मरकड (वय 26, रा. खराबवाडी, तिवारी हॉस्पिटल समोर, चाकण, मूळ रा. निवडुंगे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी शुक्रवारी (दि. २८) याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रस्त्यावर उभे असताना आरोपी कारमधून आले व “तू लग्न करायचे नाही” असे म्हणून शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपींपैकी एकाने दगडाने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले. आरोपींनी फिर्यादीची मैत्रीण इर्टीगा गाडीत ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दोघांनीही तीव्र विरोध केल्यानंतर आरोपी शिक्रापुरच्या दिशेने निघून गेले. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.