प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील जुगार अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. यात जुगार साहित्यासह रोख रक्कम जप्त करून दत्तात्रय उत्तम भुजबळ (वय ३४) आणि किसन केशव येवले (वय ४७, दोघे रा. तळेगाव ढमढेरे) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. शिक्रापूर रस्त्यावर असलेल्या डी. एस. बार शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये काही जन जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, लहानू बांगर आणि प्रतिक जगताप यांनी या ठिकाणी छापा टाकला, त्यांना दोन जन लोकांना कागदाच्या तक्त्यावर चिटकवलेली चिठ्ठी देऊन जुगार खेळवत असल्याचे दिसले. पोलिसांनी या दोघांना पकडून त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य तसेच रोख रक्कम जप्त केली. याबाबत पोलीस शिपाई प्रतिक भाऊसाहेब जगताप यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे करत आहेत.