प्रभात वृत्तसेवा पुणे – कोंंढवा, आंबेगाव परिसरात चोरट्यांनी सदनिकेतून तीन लाख ३४ हजार रुपयांचे साेन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ, तसेच कोंढवा पोलिसांत चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धनकवडीतील आंबेगाव पठार भागात एका सदनिकेत शिरलेल्या चोरट्यांनी दोन लाख १३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांंनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आंबेगाव पठार भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून आत प्रवेश केला. शयनगृहातील कपाटातून चोरट्यांनी दोन लाख १३ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. पोलीस हवालदार गोरे तपास करत आहेत.कोंढवा भागात एका सदनिकेतून चोरट्यांनी एक लाख २१ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी एकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सुखसागरनगर परिसरात राहायला आहेत. ८ डिसेंबर रोजी तक्रारदार दुपारी दीडच्या सुमारास घरातून बाहेर पडले. त्यांनी सदनिकेची चावी दरवाज्याजवळ असलेल्या जागेत लपवून ठेवली. चोरट्यांनी चावीचा वापर करुन दरवाजा उघडला.कपाटातील एक लाख २१ हजार रुपयांचे दागिने चोरून चोरटा पसार झाला. तक्रारदाराच्या घरातून ऐवज चोरणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक वैरागकर तपास करत आहेत.