पुणेः पुर्ववैमन्स आणि व्हॉटस्अप स्टेटस ठेवण्याच्या कारणातून झालेल्या वादात एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून, बिअरच्या बाटलीने मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. आकाश उर्फ आक्या किसन तराळे (वय 25,रा. खांदवेनगर, लोहगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी, खराडी पोलिसांनी विजय उर्फ जलवा संजय वाघमारे (वय 23,रा. राजाराम पाटील नगर खराडी, मुळ. पालम, जि.परभणी) याला अटक केली आहे. याबाबत आकाश याचा मित्र अमित चंद्रकांत भोसले ( वय 35,रा. उबाळेनगर वाघोली, मुळ. माणगाव मुळशी) याने फिर्याद दिली आहे. ही घटना गुरूवारी (दि.8) रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास स्वास्थ्य क्लिनिक बिल्डिंगसमोर स्वीट इंडीया चौकाजवळ खराडी येथे घडली आहे. दरम्यान,यावेळी आरोपीने फिर्यादीला देखील हाताने व लाथाबुक्याने मारहाण करून तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली आहे.