प्रभात वृत्तसेवा पुणे – शिवाजीनगर गावठाण परिसरात मांढरदेवी काळूबाई मंदिराचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी ३० हजारांचा चांदीचा मुकुट चाेरून नेला आहे. फिर्यादीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी मंदिरातून देवीचा चांदीचा मुकुट चोरून नेला. पाेलीस उपनिरीक्षक अजित बढे तपास करत आहेत. दरम्यान, धायरीतील रायकळ मळा भागातील एका आईस्क्रीम दुकानातून चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३८ हजारांचा मुद्देमाल लांबविला. रायकर मळा परिसरातील एका इमारतीत तक्रारदाराचे आईस्क्रीम पार्लर आहे. चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा मुद्देमाल लांबविला. पोलीस उपनिरीक्षक जया सोनटक्के तपास करत आहेत.