प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिका निवडणुकीला उभे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र ननावरे यांच्या कार्यालयात आलेल्या एका तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कदायक घटना महात्मा फुलेनगर येथे एक जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी बापलेकावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी १९ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिकंदर पंढरीलाल यादव (वय ३८), पंढरीलाल हंसराज यादव (वय ६०, दोघेही रा.फुलेनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापलेक गुरूवारी दुपारी कार्यालायत आले. त्यावेळी कार्यालयात आलेल्या एका तरुणीला आरोपींनी शिवीगाळ करण्यास करण्यास सुरुवात केली. त्या तरुणीला अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केला. याप्रकरणी तरुणीने तक्रार केली असता एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. “हा प्रकार राजकीय वैमनस्यातून झाला आहे. आरोपी एका पक्षाशी संबंधित असून थेट कार्यालयात घुसले. त्यानंतर त्यांनी अश्लील शिवीगाळ केली. त्यानुसार तरुणीच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” – जितेंद्र ननावरे, उमेदवार