Chikhali Accident – जड वाहनांना बंदी असलेल्या रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या मिक्सरने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजताच्या सुमारास चिखलीतील डायमंड चौक, कुदळवाडी येथे घडला.वैष्णवी सुजित दिघे (वय २२) असे मृत तरुणीचे नाव आहे. सीमा बजरंग ढमाले (वय ३०) असे जखमी महिलेचे नाव आहे. याबाबत अमोल सखाराम ठोसर (वय ३६, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ, जि. पुणे) यांनी शनिवारी (दि. ७) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मिक्सर चालक आरोपी बिहारी पांडुरंग जाधव (वय ४१, रा. काळे कॉलनी, चऱ्होली, ता. खेड, जि. पुणे) याला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मेव्हणी वैष्णवी दिघे आणि एक महिला सीमा ढमाले या दोघी वैष्णवीच्या दुचाकी (एमएच १४ एफएल ०२५२) वरून जात होत्या. भरधाव वेगात आलेल्या मिक्सर ट्रक (एमएच १४ एलएल ८८०३) वरील चालकाने दुचाकीला धडक दिली. डायमंड चौकातील रस्त्यावर अवजड वाहतुकीला बंदी आहे. असे असताना देखील मिक्सर चालकाने त्याचे वाहन या रस्त्याने आणले. या अपघातात वैष्णवी आणि सीमा यांच्या अंगावरून मिक्सरचे चाक गेले. त्यात वैष्णवी हिचा मृत्यू झाला. तर सीमा या गंभीर जखमी झाल्या आहेत. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.