प्रभात वृत्तसेवा चिंबळी – पुणे-नाशिक महामार्गावर एका भरधाव रिक्षाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (१६ डिसेंबर) रात्री पुणे-नाशिक हायवेवरील कुरुळी गावच्या हद्दीत स्पायसर चौक येथे घडली.या अपघातात संदीप जगरनाथ गुप्ता (वय २७) याचा मृत्यू झाला आहे. याबाबत मोहम्मद हानिफ खालिद (३४, नाणकरवाडी, चाकण; मूळ रा. देवरिया, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आणि त्यांचा मित्र संदीप गुप्ता कंपनीतून सुट्टी झाल्यानंतर दुचाकीवरून घरी जात होते. स्पायसर चौकात सिग्नल जवळ पाठीमागून येणाऱ्या रिक्षाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात संदीप गुप्ता याचा मृत्यू झाला, तर फिर्यादीच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.