प्रभात वृत्तसेवा पिंपरी – ज्वेलर्स दुकानातील कामगाराने ८० ग्रॅम सोने घेऊन पलायन केल्याची घटना समोर आली. या दागिन्यांची किंमत ६ लाख ४० हजार रुपये इतकी आहे. ही घटना भोसरीतील गुडविल चौकात शुक्रवारी (दि. ५) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली.भैरुसिंग जवानसिंग सोलंकी (वय २८, रा. धोरा वरती, बोडसी, जालोर, राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. दर्शन राजेश जैन (वय 28, रा. 347 सेंटर स्ट्रीट, कॅम्प, पुणे) यांनी मंगळवारी (दि. ९) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना वॉशरूमला आल्याने ते वॉशरूमकडे गेले असताना त्यांच्या कामगार सोलंकीकडे सोन्याची बॅग दिली होती. मात्र त्याने विश्वासघात करीत बॅगसह पळ काढला. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.