शिरूर : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे घरासमोर पार्किंगमध्ये उभी केलेली पिकअप गाडी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक सोमनाथ नथू जाधव (२४, रा. कवठे येमाई) यांनी आपली पिकअप (क्र. MH-14-HG-4415) १५ जानेवारी रोजी रात्री घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता त्यांना गाडी जागेवर दिसली नाही. परिसरात शोध घेऊनही गाडी न सापडल्याने अखेर पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीला गेलेल्या जुन्या गाडीची किंमत अंदाजे ५ लाख रुपये असून, एकूण नुकसान ५ लाख ६० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पोलीस हवालदार शरद वारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.