Girish Mahajan Nashik Controversy : प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये आयोजित शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख राहून गेल्याने वाद निर्माण झाला.

या घटनेनंतर वनविभागातील महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी जाहीरपणे संताप व्यक्त करत, “नोकरी गेली तरी चालेल, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही,” असे ठामपणे सांगितले. महिला कर्मचाऱ्याच्या या आक्रमक भूमिकेनंतर कार्यक्रमस्थळी काही काळ तणावजन्य वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.

बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख न झाल्याने उपस्थितांमध्येही अस्वस्थता पसरली. या संपूर्ण प्रकारानंतर मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan )यांनी यावर पहिली प्रतिक्रिया देत दिलगिरी व्यक्त केली. “भाषणात अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव राहून गेलं. माझा तसा कोणताही हेतू नव्हता.

Girish Mahajan Nashik Controversy

मुद्दाम नाव डावललेलं नाही. माझी मागील भाषणं पाहिली तर कधीही असं झालेलं नाही. हे चुकून झालं असून मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाबाबत आदर आणि संवेदनशीलतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया अनेक स्तरांतून व्यक्त होत आहे.

हेही वाचा : Girish Mahajan : गिरीश महाजनांच्या भाषणादरम्यान वाद; बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याने सरकारी महिला कर्मचारीने विचारला जाब