Trump On WEF। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत तेंव्हापासून त्यांनी त्यांच्या निर्णयामुळे जगाला वेठीस धरण्याचे काम केले आहे. त्यांच्या याच धोरणांविरुद्ध आणि त्यांच्या आक्रमक शैलीविरुद्ध जगभरातून निषेध नोंदवण्यात येत आहे. त्यात आता व्हेनेझुएला आणि ग्रीनलँडसारख्या मुद्द्यांवर अमेरिकेच्या भूमिकेनंतर, अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांनी ट्रम्प यांच्या वर्तनाचे हुकूमशाही म्हणून वर्णन केले आहे. दरम्यान, स्वित्झर्लंडमधील दावोस याठिकाणी जागतिक आर्थिक मंचात (WEF) ट्रम्प यांनी स्वतःबद्दल एक आश्चर्यकारक विधान केले. त्याच्या या विधानाने जगभरात एकच खळबळ उडाली आहे. “लोक म्हणतात मी हुकूमशहा” Trump On WEF। जागतिक आर्थिक मंचाला संबोधित करताना ट्रम्प यांनी खळबळजनक विधान केले. ट्रम्प यावेळी त्यांच्या भाषणाला मिळालेल्या प्रतिसादाचा उल्लेख केला. यावेळी त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याविषयी बोलताना,”आम्ही एक उत्तम भाषण दिले, आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला. मला स्वतःवर विश्वास बसत नाही,” ट्रम्प म्हणाले. दरम्यान , यावेळी त्यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देताना ट्रम्प यांनी, “लोक सहसा म्हणतात की तो एक भयानक हुकूमशहा आहे. हो, मी हुकूमशहा आहे, परंतु कधीकधी तुम्हाला हुकूमशहाची गरज असते.” असे म्हणत त्यांनी एकच खळबळ उडवून दिली. “माझे निर्णय ज्ञानावर आधारित, विचारसरणीवर नाही” त्यांच्या निर्णयांचे समर्थन करताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की ते कोणत्याही विशिष्ट विचारसरणीने नव्हे तर व्यावहारिकतेने प्रेरित होते. ते म्हणाले, “हे सर्व सामान्य ज्ञानावर आधारित आहे. रूढीवादी किंवा उदारमतवादी असण्यासारखे काही नसते. सुमारे ९५ टक्के निर्णय सामान्य ज्ञानावर आधारित असतात आणि हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.” ग्रीनलँडवरील विधानामुळे जागतिक तणावात वाढ Trump On WEF। यापूर्वी दावोसमध्ये, ट्रम्प यांनी कबूल केले होते की त्यांच्या विधानांमुळे जगभरात तणाव निर्माण झाला होता. मात्र, त्यांनी असेही म्हटले होते की, त्यांच्या हेतूंचा चुकीचा अर्थ लावण्यात आला होता. याविषयी ट्रम्प म्हणाले, “लोकांना वाटले की मी बळाचा वापर करेन, परंतु मला बळाचा वापर करण्याची गरज नाही. मला बळाचा वापर करायचा नाही आणि मी करणारही नाही.”