Shivank Avasthi। कॅनडातील टोरंटो विद्यापीठाच्या स्कारबोरो कॅम्पसजवळ झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेविषयी तीव्र शोक व्यक्त केला. हायलँड क्रीक ट्रेल आणि ओल्ड किंग्स्टन रोड परिसरात झालेल्या गोळीबारात शिवांक अवस्थी या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाणिज्य दूतावासाने या मृत्यूबाबत, “आम्ही पीडितेच्या कुटुंबाशी संपर्कात आहेत आणि आवश्यक मदत देण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत काम करत आहेत” असे सांगितले आहे. वाणिज्य दूतावासाने सोशल मिडियावर पोस्ट करत, “टोरंटो विद्यापीठाच्या स्कारबोरो कॅम्पसजवळ झालेल्या गोळीबारात शिवांक अवस्थी या तरुण भारतीय डॉक्टरेट विद्यार्थ्याच्या दुःखद मृत्यूबद्दल आम्ही आमच्या तीव्र शोक व्यक्त करतो. या कठीण काळात वाणिज्य दूतावास शोकाकुल कुटुंबाच्या संपर्कात आहे आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहे.”असे म्हटले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी काय सांगितले Shivank Avasthi। टोरंटो सनच्या वृत्तानुसार, गोळीबाराची माहिती मिळताच, ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना गोळीबाराने जखमी झालेला एक माणूस आढळला, ज्याला घटनास्थळी मृत घोषित करण्यात आले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिस येण्यापूर्वीच संशयित घटनास्थळावरून पळून गेले. तपासादरम्यान परिसर बंद करण्यात आला होता. टोरंटो सनच्या वृत्तानुसार, टोरंटोमध्ये या वर्षी झालेली ही ४१ वी हत्या आहे. काही दिवसांत शहरातील एका भारतीयाचा गुन्हेगारीशी संबंधित हा दुसरा मृत्यू होता. हिमांशी खुरानाची यापूर्वी हत्या करण्यात आली होती. Shivank Avasthi। टोरंटो पोलिसांनी पूर्वी सांगितले होते की शहरात एका ३० वर्षीय भारतीय वंशाच्या महिलेचा मृतदेह आढळला होता, त्यानंतर त्यांनी पीडितेला ओळखणाऱ्या संशयितासाठी कॅनडाभर अटक वॉरंट जारी केले. मृताची ओळख टोरंटोची रहिवासी हिमांशी खुराणा अशी झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी अब्दुल गफूरी, ३२ वर्षीय टोरंटोचा रहिवासी याचा शोध सुरू आहे.