Mexico News : द जेलिस्को न्यू जनरेशन कार्टेल या मेक्सिकोमधील (Mexico News) कुख्यात सर्वात ताकदवान गुन्हेगारी कार्टेलच्या वरिष्ठ म्होरक्याला मेक्सिको लष्कराने अटक केली आहे. मेक्सिकोच्या वायव्येकडील भागात ऑडियास फ्लोरेस सिल्वा उर्फ एल जार्डिनेरो किंवा द गार्डनर याला सोमवारी अटक करण्यात आली. कार्टेलचा नेता अल मेन्चो मारला गेल्यानंतर सिल्वा हाच कार्टेलचा (Mexico News) मुख्य वारसदार बनण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याच्या अटकेसाठी उपयुक्त माहिती देणाऱ्याला अमेरिकेने ५ दशलक्ष डॉलरचे बक्षिस जाहीर केले होते. मात्र अल मेन्चो फेब्रुवारीमध्ये लष्कराकडून ठार झाल्यानंतर दोनच महिन्यात सिल्वा याला अटक झाल्यामुळे जेलिस्को न्यू जनरेशन कार्टेलला मोठा धक्का बसला आहे. सिल्वा हा नायारित प्रांतात एल मिरादोर कम्युनिटीजवळ रस्त्याच्याकडेला असलेल्या खंदकात लपून बसला होता, तेंव्हा त्याला अटक करण्यात आली. त्याला अटक करण्याच्यावेळी कोणताही हिंसाचार झाला नाही. कोणीही जखमी किंवा मरण पावले नाही, असे मेक्सिकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. Mexico News मेक्सिकोच्या (Mexico News) अध्यक्षा क्लॉडिया शेनबॉम यांनी ड्रग कार्टेलचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी धडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर टोळ्यां संपवण्यासाठी मोठा हिंसाचार झाला. पण तरी या टोळ्यांचा नाश करण्यात सरकारला यश येत असल्याचे आता दिसून येते आहे. गेल्या वर्षी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी जालिस्को न्यू जनरेशन कार्टेल आणि इतर पाच मेक्सिकन कार्टेलना परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. कोण आहे फ्लॉरेस सिल्वा? मेक्सिकन सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते ऑडियास फ्लोरेस सिल्वा हा ओसेगुएरा सर्व्हेंटेसचा सुरक्षा प्रमुख होता आणि नायरीट, जालिस्को, मेक्सिको स्टेट आणि झाकाटेकास या राज्यांमध्ये कार्टेलच्या अमली पदार्थ उत्पादन आणि तस्करीच्या कारवायांचे नेतृत्व करण्यास मदत करत होता. लहान वयातच फ्लोरेस सिल्वाला अमेरिकेत अटक करण्यात आली. तिथे त्याने अमली पदार्थांच्या तस्करीसाठी पाच वर्षांची शिक्षा भोगली. त्यानंतर तो मेक्सिकोला परतला. २०१६ मध्ये, जालिस्कोमध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात कथित सहभागाबद्दल मेक्सिकन अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली होती आणि तीन वर्षांनंतर त्याची सुटका करण्यात आली. २०२१ पासून, अमेरिकेने अमली पदार्थांच्या तस्करीचा कट आणि शस्त्र बाळगल्याच्या आरोपांखाली फ्लोरेस सिल्वाच्या प्रत्यार्पणाची विनंती मेक्सिकोकडे केली आहे.