जोहान्सबर्ग – अमेरिकेत होणाऱ्या जी-२० परिषदेत दक्षिण आफ्रिकेला निमंत्रण न देण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयावर दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामफोंसा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिका जी-२० गटाचा संस्थापक सदस्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. अल्पसंख्य श्वेतवर्णियांना भेदभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करून दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली जोहान्सबर्ग येथे २२ – २३ नोव्हेंबरला झालेल्या जी-२० परिषदेवरअमेरिकेने बहिष्कार घातला होता. त्या परिषदेच्या सांगता सत्रामध्ये भावीअध्यक्ष असलेल्या अमेरिकेच्या वरिष्ठ दूतांकडे अध्यक्षपदाची सूत्रे सापवली गेली नव्हती. त्यामुळे फ्लोरिडा येथे होणाऱ्या जी-२० साठी दक्षिण आप्रिकेला निमंत्रित केले जाणार नाही, असे ट्रम्प म्हणाले होते. तथापि अमेरिकन दूतावासाच्या अधिकाऱ्याकडे फिरते अध्यक्षपद सोपवले आहे, असे दक्षिण आफ्रिकेने म्हटले आहे. दक्षिण आफ्रिका जी-२० चा पूर्ण, सक्रिय आणि रचनात्मक सदस्य आहे आणि राहील, असे काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात, रामाफोसा म्हणाले. आफ्रिकान लोकांविरुद्ध दक्षिण आफ्रिका नरसंहार करत आहे या ट्रम्प यांनी वारंवार केलेला दावा सपशेल चुकीचा आहे, असेही ते म्हणाले.