Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या जागतिक राजकारणात केंद्रस्थानी आहेत. एकीकडे टॅरिफ धोरणांमुळे जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली असताना, दुसरीकडे त्यांच्या वैयक्तिक संपत्तीबाबत मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवघ्या एका वर्षात ट्रम्प यांच्या संपत्तीत तब्बल 1.4 अब्ज डॉलर्सची वाढ झाल्याचा दावा करण्यात आला असून, ही रक्कम भारतीय चलनात सुमारे 13,000 कोटी रुपये इतकी आहे. न्यूयॉर्क टाइम्सचा मोठा खुलासा अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ च्या अहवालानुसार, जानेवारी 2025 मध्ये पुन्हा सत्तेवर आल्यानंतर ट्रम्प यांच्या संपत्तीत ही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. टॅरिफ धोरणे, गुंतवणूक करार, जागतिक बाजारातील व्यवहार आणि व्यावसायिक गुंतवणुकीमुळे ही आर्थिक वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. Donald Trump ट्रम्प यांचे दावे आणि आर्थिक धोरण डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः दावा केला आहे की, त्यांच्या आक्रमक आर्थिक धोरणांमुळे अमेरिकेत 18 ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक आली आहे. भारतासह अनेक देशांवर लादण्यात आलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेला मोठा आर्थिक फायदा होत असल्याचंही त्यांनी स्पष्टपणे मान्य केलं आहे. भारतातही गुंतवणूक, पुण्यात मालमत्ता ट्रम्प यांच्या संपत्तीचा विस्तार केवळ अमेरिकेपुरताच मर्यादित नाही. भारतासह अनेक देशांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पुण्यातही ट्रम्प यांची मालमत्ता असल्याचे अहवालांमधून समोर आले आहे. एकूण संपत्ती किती? सध्याच्या आकडेवारीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांची एकूण संपत्ती सुमारे 7.3 अब्ज डॉलर्स इतकी असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र काही अहवालांनुसार ही संपत्ती प्रत्यक्षात यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्या उत्पन्नाचे अनेक स्रोत पूर्णपणे सार्वजनिक नाहीत. जागतिक राजकारणात आक्रमक धोरणांसाठी ओळखले जाणारे डोनाल्ड ट्रम्प आर्थिक बाबतीतही मोठ्या वेगाने प्रगती करत असल्याचं चित्र आहे. एका वर्षात 13,000 कोटींची वाढ ही केवळ वैयक्तिक संपत्तीची आकडेवारी नसून, त्यांच्या राजकीय सत्तेचा आणि आर्थिक प्रभावाचा मोठा निर्देश मानला जात आहे.