Donald Trump hand blue spot: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी कारण ठरलं आहे त्यांच्या हातावर दिसलेली जखम. दावोस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाल्यानंतर समोर आलेल्या काही छायाचित्रांमध्ये ट्रम्प यांच्या डाव्या हातावर निळसर जखम स्पष्ट दिसत होती. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं. हातावर निळसर जखम, चाहत्यांमध्ये चिंता दावोस परिषदेहून परतताना पत्रकारांनी ट्रम्प यांना या जखमेबाबत थेट प्रश्न विचारले. त्यावर स्पष्टीकरण देताना ट्रम्प म्हणाले, “माझा हात चुकून टेबलावर आदळला. त्यामुळे ही किरकोळ जखम झाली. मी त्यावर क्रीम लावली असून आता पूर्णपणे ठणठणीत आहे.” Donald Trump अॅस्पिरिनमुळे जखम वाढल्याचा दावा ट्रम्प यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती देताना सांगितलं की, ते नियमितपणे अॅस्पिरिन घेतात. “अॅस्पिरिन घेतल्यामुळे सहजपणे जखम होते, हे डॉक्टरांनीही सांगितलं आहे. मात्र ही गंभीर बाब नाही. काळजी म्हणून मी औषध घेत आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. व्हाईट हाऊसचं अधिकृत स्पष्टीकरण या प्रकरणावर व्हाईट हाऊसनेही खुलासा केला आहे. प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी निवेदनात म्हटलं, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा हात टेबलाच्या कोपऱ्याला लागला होता. त्यामुळेच ही जखम झाली असून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचं कारण नाही.” यापूर्वीही झाली होती अशीच जखम महत्त्वाचं म्हणजे, यापूर्वीही ट्रम्प यांच्या हातावर अशीच जखम दिसली होती. त्या वेळी त्यांनी मेकअप किंवा पट्टीने हात झाकला होता आणि त्यामागेही अॅस्पिरिनचं कारण दिलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातावरील जखम ही किरकोळ अपघात आणि औषधांच्या दुष्परिणामामुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे. व्हाईट हाऊस आणि स्वतः ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या प्रकृतीला कोणताही गंभीर धोका नाही.