वॉशिंग्टन : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या ३७ वर्षांच्या राजवटीचा अंत करण्याचे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील नागरिकांना केले आहे. इस्लामिक रिपब्लिकविरुद्ध अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या निदर्शनांनंतर आता इराणमध्ये नवीन नेतृत्व शोधण्याची वेळ आली आहे. देश चालवण्यासाठी दडपशाही आणि हिंसाचारावर इराणचे नेतृत्व अवलंबून आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांनी देशाच्या विनाशासाठी आणि अभूतपूर्व प्रमाणात हिंसाचाराचा वापर केल्याबद्दल खामेनींना दोषी ठरवले. देशाचे कामकाज चालू ठेवण्यासाठी नेतृत्वाने देश योग्यरित्या चालवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि नियंत्रण ठेवण्यासाठी हजारो लोकांना मारण्यावर लक्ष केंद्रित करता कामा नये, असेही ट्रम्प म्हणाले. खामेनी यांनी निदर्शकांना देशद्रोही ठरवून आणि ट्रम्प यांना जीवितहानीसाठी जबाबदार ठरवून शिक्षा करण्याचे जाहीर केल्यानंतर ट्रम्प यांनी देशवासियांना हे आवाहन केले आहे. इराणी अधिकाऱ्यांनी निदर्शनांना दहशतवादी म्हणून कृत्ये संबोधले आणि हे निदर्शक अमेरिकेच्या कटाचा भाग असल्याचा दावा केला होता. दरम्यान, २८ डिसेंबर रोजी देशाच्या अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेच्या विरोधात झालेल्या निदर्शनांवर कडक कारवाई केल्यानंतर इराणमध्ये पुन्हा तणावपूर्ण शांतता पसरली आहे. अमेरिकेतील ह्युमन राईटस ऍक्टिव्हिस्ट न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार इराणमधील हिंसाचारात ३,०९५ जणांचा मृत्यू झाला आहे. अशांतते दरम्यान, अधिकाऱ्यांनी सर्व इंटरनेट बंद केले आहे. तरी काही भागात थोड्या काळासाठी वार्तांकनासाठी आणि मर्यादित ऑनलाइन सेवा पुन्हा सुरू झाल्या आहेत. इराणमधील आंदोलन अमेरिकेच्या निर्बंधांमुळे अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळेच इराणमध्ये आंदोलन सुरू झाले आहे, असा आरोप अमेरिकेचे माजी सनदी अधिकारी के.पी. फेबियन यांनी केला आहे. अमेरिकेने बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या काळात इराणवरील निर्बंध उठवले होते. परंतु ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यानंतर आणखी कडक निर्बंध लादल्यानंतर अशांतता निर्माण झाली. अमेरिकेने निर्बंध लादल्यानंतर इराणमध्ये वाढत्या किमतींवरून निदर्शने झाली हे खरे आहे. या निर्बंधांमुळेच इराणची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. त्यातून बाहेर पडणे शक्यच झाले नाही. परिणामी झालेल्या भाववाढीमुळे जनता रस्त्यावर उतरली आहे, असे फेबियन म्हणाले.