नेवासा : नेवासे नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राज्याचे माजी मंत्री शंकरराव गडाख गटाने आपले पूर्ण बहुमत सिद्ध केले आहे. बुधवार, दि. १४ रोजी झालेल्या या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्ष आणि आम आदमी पक्ष यांच्या संयुक्त उमेदवार शालिनी संजय सुखधान यांनी विजय मिळवला आहे. सुखधान यांना १० तर सरोदे यांना ८ मते मिळाली सदर मतदान प्रकिया ही हात उंचावून घेत करण्यात आली. क्रांतिकारी पक्षाचा उदार निर्णय विशेष म्हणजे, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नगरपंचायतीत ९ सदस्य असूनही त्यांनी आपल्या उमेदवाराऐवजी आम आदमी पक्षाच्या नगरसेविका शालिनी सुखधान यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली. या निर्णयाचे नेवासे शहरात आणि तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. हा निर्णय गडाख गटातील एकजुटीचे आणि उदार मनाचे प्रतीक मानले जात आहे. निवड प्रक्रियेला उपस्थित प्रमुख नेते निवड प्रक्रियेदरम्यान क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे गटनेते जितेंद्र कुऱ्हे, नगरसेवक संभाजी धोत्रे, स्वप्नील मापारी, नगरसेविका जयश्री शिंदे, नसरीन शेख, सोनल चव्हाण, शहिदाबी पठाण, शोभा व्यव्हारे, प्रतिभा गवळी यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते. सत्तेचा दुरुपयोग – संजय सुखधान नगरपंचायत अधिनियमात स्पष्टपणे बोटवर करून मतदान असा नियम असतांना सत्तेचा गैरवापर करण्याचे षडयंत्र रचविले होते त्याला अधिकाऱ्यांची साथ मिळत होती परंतु अगदी जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आम्हाला जावे लागले जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला न्याय दिला माजी मंत्री गडाख यांनी दिलेला शब्द पाळून सर्वसामान्य महिलेला उपनगराध्यक्ष केले आता सामान्य नेवासकर जनतेसाठी काम केले जाईल असे आपचे नेते ॲड.संजय सुखधान यांनी सांगितले. अखेर कायदेशीर लढ्यात विजय! नेवासे नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदाची निवड बुधवारी पार पडली दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी नगरसेवकांचे मतदान हात उंचावून घेणे आवश्यक असतांना,पिठासीन अधिकारी असलेल्या नगराध्यक्षांनी राजकीय सूडबुद्धीने निवडणूक प्रक्रिया सायंकाळी ४ वाजेपर्यंत जाणीवपूर्वक लांबवली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही निवडणूक प्रक्रियेत नियमबाह्य हस्तक्षेप होत असल्याने अखेर जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागावी लागली आमची बाजू कायदेशीर असूनही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आला असा आरोप करण्यात आले सर्व अडथळ्यांवर मात करत माजी मंत्री शंकररावजी गडाख यांच्या नेतृत्वाखाली नेवासे नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी शालिनी संजय सुखधान यांची निवड झाली. एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला नेवासे शहराच्या उपनगराध्यक्षपदाची संधी मिळणे हे सामाजिक व राजकीय परिवर्तनाचे प्रतिक असल्याची भावना यावेळी नागरिकांतून व्यक्त करण्यात होती आहे. नेवासे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निष्ठेने काम करणार उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारताना शालिनी संजय सुखधान म्हणाल्या की,“माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या संधीचा उपयोग नेवासे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निष्ठेने करणार आहे.”