प्रभात वृत्तसेवा मंचर – आंबेगाव तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा भाजप पक्षाचे नेते जयसिंग एरंडे यांनी बुधवार, दि.१४ रोजी केली.मंचर-निघोटवाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला भाजपचे सरचिटणीस डॉ.ताराचंद कराळे,भानुदास काळे,विजय पवार,प्रमोद बाणखेले,संदीप बाणखेले,अरविंद वळसे पाटील,राजेश काळे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते. भाजपचे नेते जयसिंग एरंडे म्हणाले की पक्षाने माझी आंबेगाव निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या १०, अशा एकूण पंधरा जागांसाठी जवळपास ७० ते ७५ उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे पक्ष पक्षाच्या नियमानुसार योग्य त्या उमेदवारास उमेदवारी देऊन त्याच्या पाठीमागे ताकद देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अरुण गिरे हे भाजपमध्ये आले तर त्यांचे आम्ही स्वागत करू.असे त्यांनी सांगितले.