Video व्हायरल! झिम्बाब्वेच्या खेळाडूंचे बसमध्ये जोरदार सेलिब्रेशन; ऑस्ट्रेलियाविरुद्धचा ऐतिहासिक विजय दणक्यात साजरा

टाऊन्सविले – झिम्बाब्वेने शनिवारी तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना तीन गडी राखून जिंकत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायभूमीत पहिल्यांदाच ऐतिहासिक विजय नोंदवला. लेगस्पिनर रायन बर्लने कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत 10 धावांत पाच विकेट्स घेतल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 141 धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने 66 चेंडू राखून बाद 142 अशी मजल मारत विजयाचे लक्ष्य गाठले.
#3rdODI | Just in case you were wondering how we’re feeling after our historic victory over Australia in Townsville! 🇿🇼💪🏾#AUSvZIM | #VisitZimbabwe pic.twitter.com/qwMQIBRDsK
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) September 3, 2022
प्रथमच झिम्बाब्वे संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर हरविण्याचा पराक्रम केला आहे. झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 33 एकदिवसीय सामने झाले. यातील तीनच सामने झिम्बाब्वेने जिंकले आहेत.
दरम्यान, ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर झिम्बाब्वेच्या खेळाडूंचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी बसमध्ये जोरदार सेलिब्रेशन करत आंनद व्यक्त केला.
#3rdODI | Castle Corner, see what you’ve done? But who can blame us! Thanks for the support and inspiration, home or away! @CastleCornerZW #AUSvZIM | #VisitZimbabwe pic.twitter.com/Vp6VYRWSXU
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) September 3, 2022
या सेलिब्रेशनचा व्हिडिओ झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.



