“भाजपचे सरकार बनण्याची शक्यता शून्य टक्के” – अखिलेश यादव
Updated On:

लखनौ – भाजपने लोकसभेच्या ४०० जागा जिंकण्याचा दावा केला. मात्र, ४ टप्प्यांनंतर जनतेने त्या संख्येतील ४ गायब केला आहे. आता केवळ डबल शून्य उरले आहेत. केंद्रात भाजपचे सरकार बनण्याची शक्यता शून्य टक्के आहे, असे भाष्य समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केले. चौथ्या टप्प्यासाठी मतदान झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली.
पुढील ३ टप्प्यांत भाजपला हरवण्यासाठी आणि इंडिया आघाडीचे सरकार आणण्यासाठी जनता आणखी उत्साहाने मतदान करेल. इंडियाला जनता विजयी करत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत झालेले मतदान आपल्यासाठी अनुकूल ठरल्याचा दावा इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे.





