“छोट्या कपड्यांमुळे…” ; झाकीर नाईकने महिलांविरुद्ध ओकली गरळ, लैंगिक छळाबद्दल केले वादग्रस्त विधान

Zakir Naik। वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक यांनी वारंवार महिलांविरुद्ध विष ओकले आहे. आता त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ते लैंगिक अत्याचारासाठी महिलांच्या कपड्यांना जबाबदार धरताना दिसत आहेत. झाकीर नाईक याने, “जर महिला कुराणाच्या ड्रेस कोडचे पालन करत नसतील आणि त्यांच्यावर अत्याचार झाला तर त्यासाठी त्या स्वतःच जबाबदार आहेत”असे म्हणत नवीन वाद निर्माण केला आहे.
मागच्या वर्षी एका युट्यूब चॅनलने अपलोड केलेल्या या दोन मिनिटांच्या क्लिपमध्ये नाईकएका प्रश्नोत्तर सत्रादरम्यान एका प्रश्नाचे उत्तर देताना दिसत आहे. त्यात तो,”बलात्कार आणि खून हे गंभीर पाप असले तरी, ज्या महिला “कुराणच्या ड्रेस कोड” चे पालन करत नाहीत त्यांच्यावर अत्याचार झाला तर त्यासाठी त्या स्वतःच जबाबदार आहेत” “जर महिलेने अश्लील कपडे घातले असतील ज्यामुळे बलात्कार झाला असेल तर ती जबाबदार आहे,” असे नाईक असे म्हणत खळबळजनक विधान केले आहे. Zakir Naik।
Popular Islamist scholar with millions of followers, Zakir Naik, says that abusing girls who do not comply with Islamic dress code is allowed by Allah, and that if a girl is raped and murdered, it’s her own fault.
This is another level of disgusting and evil. pic.twitter.com/wIMtKewz4m
— Dr. Maalouf (@realMaalouf) October 18, 2025
नाईकने पुढे बोलताना ,”जर बलात्कारी व्यक्तीने इस्लामिक कायद्यानुसार प्रामाणिकपणे पश्चात्ताप केला तर त्याला दैवी क्षमा मिळू शकते, पीडित आणि गुन्हेगार दोघांनाही आध्यात्मिक परीक्षेतून जात असल्याचे सिद्ध करून क्षमा मिळू शकते” असे म्हटले.
इतिहासकार आणि तज्ज्ञांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. प्रसिद्ध इतिहासकार इरफान हबीब यांनी नाईकच्या विधानांचा निषेध करत “तो एक भयानक माणूस आहे… सर्व सुज्ञ लोकांनी त्याचा स्पष्टपणे निषेध केला पाहिजे.” असे म्हटले. दरम्यान , त्यांच्या पोस्टने आणखी वादविवाद सुरू केला, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी नाईकच्या वादग्रस्त विधानांपासून वेगळे असलेल्या इस्लामच्या व्याख्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नेटिझन्सनी या क्लिपचे वर्णन महिलांबद्दल द्वेषपूर्ण आणि धोकादायक असल्याचे म्हटले आहे आणि अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे व्यापक सामाजिक पूर्वग्रह निर्माण होऊ शकतात असा इशारा दिला आहे. Zakir Naik।





