Zaheer Alam : १९९० च्या दशकात एका गाण्याने संपूर्ण देशात प्रेक्षकांना वेड लावले होते. अल्ताफ राजा यांच्या खास आवाजातील ‘तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे’ हे गाणे त्या (Zaheer Alam) काळातील तरुण-तरुणींच्या ओठांवर झळकत होते. प्रियकर-प्रेयसीच्या भावनिक व्यथा आणि विरह व्यक्त करणारे हे गाणे रिक्षा, चहाच्या टपऱ्या, विवाहसमारंभ ते रेडिओ-सेटवर सर्वत्र घुमत होते. या गाण्याने ९० च्या दशकात प्रचंड क्रेझ निर्माण केली होती. परंतु या अजरामर गाण्याचे गीतकार जहीर आलम (Zaheer Alam) यांचे आज नागपूर येथे निधन झाले आहे. ते नागपूरच्या मोमीनपुरा भागातील एका छोट्याशा घरात राहत होते. गेल्या काही वर्षांपासून ते नागपूरकरांच्या विस्मरणात गेले होते. त्यांचे जीवन संघर्ष आणि आर्थिक विवंचनेचे होते. Zaheer Alam गाण्याने अनेकांनी पैसा कमावला, गीतकाराला मात्र उपेक्षा ‘तुम तो ठहरे परदेसी…’ हे गाणे सुरुवातीला स्थानिक स्तरावर कव्वाली स्वरूपात गायले जात होते. अल्ताफ राजा यांनी ते आपल्या म्युझिक अल्बममध्ये गायल्यानंतर मात्र हे गाणे रातोरात सुपरहिट झाले. अल्बम कंपनी आणि गायक अल्ताफ राजा यांनी या गाण्यावरून भरपूर कमाई केली. मात्र, गीतकार जहीर आलम (Zaheer Alam) यांच्या वाट्याला मात्र केवळ कष्ट आणि उपेक्षा आली. त्यांची झोळी रिकामीच राहिली. या गाण्याने त्यांच्या आयुष्यातील आर्थिक चणचण संपवावी अशी अपेक्षा होती, परंतु तसे घडले नाही. त्यांनी एम्प्रेस मिलमध्ये नोकरी केली होती. मिल बंद पडल्यानंतर त्यांच्या जीवनातील कष्टांचा प्रवास अधिकच बिकट झाला. फक्त ३ हजार रुपये मानधन गीतकार म्हणून जहीर आलम यांनी एका चित्रपटासाठी गीत लिहिले होते. ते गाणे खूप गाजले. मात्र, चित्रपटातील इतर गाणी नामवंत गीतकारांची होती. जहीर आलम यांनी गीतकार म्हणून फक्त आपलेच नाव जावे, अशी अट घातली होती. तरीही त्यांचे नाव पुरेसे समोर आले नाही. या एका गाण्यासाठी त्यांना केवळ ३ हजार रुपये मानधन मिळाले. असे असतानाही जहीर आलम यांनी आपल्या गीतांमधून भावनांची ओढ निर्माण केली. ‘तुम तो ठहरे परदेसी…’ सारख्या गाण्याने लाखो प्रेमिकांच्या मनात घर केले, पण गीतकार स्वतः मात्र आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या उपेक्षित राहिले.