युवराज सिंग निवृत्ती स्विकारण्याच्या तयारीत

आंतराष्ट्रीय टी-20 लिग्स खेळण्यासाठी घेणार निर्णय

नवी दिल्ली – भारतीय संघातील स्फोटक फलंदाज युवराज सिंग निवृत्तीच्या विचारात आहे. गेली दोन वर्ष युवराज भारताकडून एकही वन डे किंवा ट्‌वेंटी -20 सामना खेळलेला नाही. भविष्यातही त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळेल याची शक्‍यताही कमी आहे. त्यामुळे त्याने निवृत्ती स्वीकारण्याचे ठरवले आहे. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मान्यतेने होणाऱ्या परदेशातील ट्‌वेंटी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी, अशी अट त्याने ठेवली आहे. अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिली आहे.

यावेळी बोलताना बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, युवराजकडे सध्या जीटी-20 (कॅनडा), युरो टी-20(आयर्लंड-हॉलंड) कॅरेबियन टी-20 (वेस्ट इंडिज) अशा खाजगी स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरिता प्रस्ताव आहेत आणि युवराज सध्या भारतीय संघातुन बाहेर असल्याने तो या प्रस्तावांवर विचार करत आहे. त्यामुळे त्याने या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी बीसीसीआयकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले असुन भारतीय संघातील अथवा भारताच्या स्थानिक क्रिकेट मधील कोणत्याही खेळाडूला भारता बाहेरील लीग मध्ये सहभागी होता येत नसल्याचा नियम बीसीसीआयने त्याच्या लक्षात आणुन देत त्याला सध्या ना हरकत प्रमाणपत्र नाकारले आहे. त्यामुळे तो निवृत्ती स्विकारण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

भारताचा माजी गोलंजाज इरफान पठाणला कॅरेबियन प्रीमिअऱ लीगच्या लिलावात खेळाडूंच्या यादीत स्थान देण्यात आले आहे, परंतु त्याने बीसीसीआयकडून परवानगी घेतलेली नाही. ”इरफान अजूनही प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. त्यामुळे त्याने कॅरेबियन लीगमधून माघार घ्याव, असे त्याला सांगण्यात आले आहे. युवराजलाही तिच चिंता सतावत आहे. त्यामुळे आम्हाला नियम पाहावे लागतील. त्यामुळे युवीनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तरी बीसीसीआयकडे त्याची नोंद ऍक्‍टीव्ह ट्‌वेंटी-20 खेळाडू म्हणून आहे,” असेही बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

युवराज सध्या बीसीसीआयच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या आयपीएल या स्पर्धेत मुंबई इंडियन्सया संघातर्फे खेळतो आहे.मात्र, त्याला यावेळी अंतिम संघातुन खेळण्याच्या खुप कमी संधी मिळाल्याने तो इतरही लीग्स मध्ये खेळण्याच्या विचारात असल्याचेही समजते. यावेळी युवराज जर कॅनडा येथे होणाऱ्या जीटी-20 स्पर्धेत खेळला तर त्याचा फायदा या स्पर्धेला भरपुर प्रमाणात होईल.

तसेच निवृत्ती स्विकारल्यानंतर झहीर खान आणि विरेंद्र सेहवाग देखील दुबई येथे पार पडलेल्या टी-10 लीग मध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे युवराज देखील निवृत्तीनंतर अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी होवु शकेल असेही बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधुन निवृत्त झालेले खेळाडूही बीग बॅश लीग, सीपीएल, बीपीएल सारख्या लीग्स मध्ये सहभागी होवु शकतात असेही त्यांनी पुढे नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)