कुल यांच्या कामामुळे दौंडचे तरूण प्रभावित ; केडगाव परिसरातील तरूणांचा भाजपात प्रवेश

पारगाव – राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर दौंडमधील राजकारणही बदलले आहे. विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या गटात तालुक्यातील शेकडो तरुण प्रवेश करीत आहेत. यवत, खामगाव, केडगाव, देवकरवाडी परिसरातील तरूणांनी प्रवेश करीत आमदार कुल यांच्या कामाचे कौतूक केले आहे.
दौंड तालुक्यातील राजकारण वेगळेच वळण घेत असल्याचे दिसत आहे. शेकडो तरुणांनी आमदार राहुल कुल यांचा तालुक्यातील कामांचा झंझावात पाहून व त्यांच्या कार्यास प्रेरित होऊन भाजपमध्ये दाखल झाले आहेत. (दि.30) राहू येथे आमदार कुल यांच्या निवासस्थानी तरुणांनी कमळ हाती घेतले.
यवत, खामगाव, केडगाव, देवकरवाडी परिसरातील गौरव दोरगे, किरण यादव, शुभम मासुळे, यश नागवडे, गणेश लकडे, दत्ता गाडे, सोन्या माने, अक्षय देवकर, अक्षय वाळकुंडे यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार कुल यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी आमदार कुल यांनी विकासकामे करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.





