शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या युवा नेत्याला अटक
Updated On:

कोलकाता – अंमलबजावणी संचालनालयाने शनिवारी तृणमूल कॉंग्रेसचे युवा नेते कुंतल घोष यांना शिक्षक भरती घोटाळ्यातील कथित सहभागाबद्दल अटक केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या चिनार पार्क अपार्टमेंटमध्ये रात्रभर चौकशी केली. आणि त्यांना सकाळी अटक केली. चौकशी दरम्यान तपास अधिकाऱ्यांना सहकार्य न केल्याच्या कारणावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.
ईडीने शुक्रवारी सकाळी सुरू केलेल्या शोध मोहिमेदरम्यान घोषच्या त्यांच्या जुळ्या फ्लॅटमधून अनेक कागदपत्रे आणि एक डायरी जप्त करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले. या डायरीतून काही महत्वाचे धागेदोरे आढळून आले असून त्या अनुषंगाने आता तपास केला जाणार आहे. योगायोगाने, त्याच घोटाळ्यातील कथित भूमिकेसाठी घोष यांनाही सीबीआय अधिकाऱ्यांनी समन्स बजावले आहे.





