पवार साहेबांची प्रेरणा घेऊन तरुणांनी आक्रमक होण्याची गरज- अजित पवार

मुंबई: “२०१४ साली लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना मोठे यश मिळाले मात्र नंतर दिल्लीत मोदींचा दणाणून पराभव झाला. आपल्या राज्यात ही परिस्थिती तयार करायची आहे. त्यासाठी आपल्याला कंबर कसावी लागेल, असे आवाहन विधिमंडळ पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

आदरणीय पवारसाहेब या वयातही महाराष्ट्रात परिवर्तन करण्यासाठी ते प्रचंड मेहनत घेत आहेत. पवार साहेबांची प्रेरणा घेऊन तरुणांनी देखील आक्रमक होण्याची गरज आहे, असे वक्तव्य अजित पवारांनी केले.

रोजगाराचा,कायदा-सुव्यवस्थेचा,ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न मोठा आहे.पण त्यावर कुणी बोलायला तयार नाही.मेक इन इंडिया चा ‘बब्बर शेर’ आता ‘नामशेष’ झाला आहे. स्किल इंडिया’ची अवस्था ईल इंडिया बनली आहे. म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तरुणांसाठी आवाज उठवला पाहिजे, असेही पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई प्रदेश कार्यालयात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत युवकांचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, रविकांत वर्पे यांची निवड करण्यात आली. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात युवक मेळावा संपन्न झाला. यावेळी अजित पवार बोलत होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.