ह्दयद्रावक ! थोरल्याच्या मृत्यूच्या धक्क्याने धाकट्यानंही सोडला प्राण; बंधू प्रेम बघून गावातील अन्य् एकाचा मृत्यू

वाशिम – करोना महामारीच्या संकटाने देशात हाहाकार माजवला असून करोनाने अनेकांना फारच वाईट दिवस दाखवले आहेत. कुटुंबातील कर्तीसवरती माणसे डोळय़ादेखत निघून जात आहेत. तर माता-पिता, भाऊ-बहीण असे सामुदायिक मृत्यू होत असल्याने हसत्या-खेळत्या कुटुंबांवर स्मशानकळा येताना दिसून येत आहेत. करोना काळात वाशिम जिल्ह्यातून अशीच अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान रुग्णालयात थोरल्या भावाचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच धाकट्या भावाचाही मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील सोयजना येथे हा प्रकार घडला आहे. येथील व्यक्तीचा काल उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आपल्या भावाच्या निधनाची बातमी समजताच धाकट्या भावालाही हृदयविकाराचा धक्का बसला. त्यामध्ये त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान या घटनेचा धक्का बसून गावातील अन्य् एका व्यक्तीचाही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जनार्दन सीताराम पवार, वय-75 असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. तर मुरलीधर सीताराम पवार, वय-70 असे लहान भावाचे नाव आहे.





