तरुणांच्या जिवावर निवडणूक जिंकणार : नीलेश लंके 

पारनेर – तरुणांना टुकार म्हणणारे व टुकारांना घेऊन नीलेश लंके फिरतात, अशी टीका विरोधक करतात. मात्र तरुणांच्या जिवावर आपण ही निवडणूक जिंकणार असल्याचे राष्ट्रवादीचे व आघाडी मित्र पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांनी सांगितले.

निघोज येथे माजी राज्यमंत्री अशोकराव सावंत, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रभाकर कवाद, माजी आ. दादाभाऊ कळमकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मधुकर उचाळे, सरपंच ठकाराम लंके व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला.

त्यावेळी लंके बोलत होते. माजी सभापती सुदाम पवार, गुलाबराव डेरे, सरपंच डॉ. आबासाहेब खोडदे, श्रीकांत खोडदे, बाबाजी भंडारी, सुवर्णा मुंगसे, बाळासाहेब लामखडे, अनंतराव वरखडे, नानाभाऊ वरखडे, सोमनाथ वरखडे, ऍड. बाळासाहेब लामखडे, शंकरराव लामखडे, शिवाजीराव वराळ आदी उपस्थित होते. लंके म्हणाले, तरुण कार्यकर्ते आपल्याबरोबर मोठ्या संख्येने आहेत.

तसेच ज्येष्ठ मंडळींचा सुद्धा आशीर्वाद आहे. त्यामुळे विरोधक चांगलेच हबकले आहेत. 19 दिवसांच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेचे दुःख मला समजले. पाणी बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण हे प्रश्‍न मी सोडवणार आहे.
बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध करण्याचे काम आपण केले आहे. आरोग्याचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवले आहेत. शैक्षणिक संकुल नाही की कोणतेही प्रश्न न सोडवता त्यांनी स्वतः कार्यसम्राट उपाधी लावून घेतली आहे. मी उच्चशिक्षित आहे. लोकप्रतिनिधी मात्र दहावीच आहेत.

निवडणुकीत आपणच विजयी होणार आहे. मात्र जिल्ह्यात विक्रमी मताधिक्‍याने विजयी करा. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रभाकर कवाद यांनी लंके यांनी गेली काही वर्षांत लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी काम केले म्हणून तालुक्‍यातील जनता आज त्यांच्या मागे भक्कमपणे उभी असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले असून, राष्ट्रवादी व मित्र पक्षांची सत्ता पुन्हा आणायची आहे. कळमकर, अनंतराव वरखडे, सुवर्णा मुंगसे, ग्रामपंचायत सदस्या मनीषा घोगरे यांचीही भाषणे झाली. पठारवाडीचे सरपंच दादाभाऊ पठारे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)