वाई (प्रतिनिधी) -धोम जलाशयात बुडून ज्ञानदेव शंकर डोईफोडे (वय 22, रा. भिवडी, ता. वाई) या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची फिर्याद त्याचे मामा नारायण शंकर कचरे (वय 30, रा. भिवडी) यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शंकर डोईफोडे हा शनिवारी (दि. 30 मे) दिवसभर स्वत:ची बैलजोडी घेऊन औताने शेताची मशागत करत होता. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तो औत बंद करून बैलांना पाणी पाजण्यासाठी शेजारी धोम धरणाच्या जलाशयाकडे गेला. बैलांना पाणी पाजून झाल्यावर त्यांना धुण्यासाठी तो पाण्यात शिरला; परंतु काठावर प्रचंड गाळ साठल्याने तो गाळात खोलवर बुडाला.
भिवडी ग्रामस्थांनी त्याचा अंधार पडेपर्यंत शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. रात्र झाल्याने ग्रामस्थांनी शोधमोहीम थांबवली. त्यानंतर रविवारी सकाळी आठ वाजता त्याचा मृतदेह जलाशयात सापडला.